सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे आरोप फेटाळले

सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे आरोप फेटाळले

  • Share this:

Sushma swaraj

04 जानेवारी : भारतीय जवानांनी दोन रेंजर्सला मारल्याचा कांगावा पाकिस्तानने केल्यानंतर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकचे हे आरोप फेटाळले आहेत. भारतीय जवानांनी पाकच्या रेंजर्सला मारले नसल्याचे सांगत पाकने गोळीबार थांबवल्यास भारतही प्रत्युत्तर देण्यास थांबवेल, असे त्यांनी पाकला सुनावले आहे.

जम्मू-काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारात शनिवारी 2 जवान शहीद झाले तर 1 महिला ठार झाली आहे. यासंदर्भात सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी पाकिस्तानच्या आरोपांवर सडेतोड उत्तर दिले आहे.

भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या रेंजर्सला मारले नाही. पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी फक्त प्रत्युत्तर दिले असे स्वराज यांनी म्हटले आहे. सीमेवर शांतता कायम राहण्यासाठी भारताने नेहमीच प्रयत्न केले. पाकिस्ताननेही अशाच पद्धतीने शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, असे स्वराज यांनी पत्रात नमूद केले.

दरम्यान, सीमा रेषेवरील गोळीबारामुळे सीमेवरच्या गावातील सुमारे एक हजार लोक आपले घर सोडून अन्यत्र स्थलांतर करत आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: January 4, 2015, 5:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading