S M L

एअर इंडियाच्या दिल्ली-काबूल विमानाच्या अपहरणाचा कट?

Samruddha Bhambure | Updated On: Jan 4, 2015 07:27 PM IST

एअर इंडियाच्या दिल्ली-काबूल विमानाच्या अपहरणाचा कट?

04 जानेवारी :  एअर इंडियाच्या दिल्ली-काबूल या विमानाच्या अपहरणाचा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. त्यामुळे यानंतर काबूलला जाणार्‍या एअर इंडियाच्या सर्व विमानांना हायअलर्ट देण्यात आला आहे. दहशतवादी या विमानाचे अपहरण करण्याचा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे.

1999 मध्ये दहशतवाद्यांनी कंदहार येथे आयसी 814 या विमानाचे अपहरण केले होते. दहशतवादी पुन्हा याची पुनरावृत्ती करू शकतात अशी माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली आहे. अपहरणासाठी दहशतवादी एअर इंडियाच्या विमानालाच टार्गेट करतील असे गुप्तचर यंत्रणेने म्हटलं आहे. यानंतर दिल्लीसह देशातल्या सर्व विमानतळावर हायअलर्टचा इशारा देण्यात आला आहे. प्रवाशांसोबतच विमानतळावरील कर्मचार्‍यांचीही कसून तपासणी केली जात आहे.


एअर इंडियाचे कोलकता येथील कार्यालय उडवून देण्याची धमकी शनिवारी आल्यानंतर या सूचना देण्यात आल्या आहेत. कोलकता विमानतळावरील सुरक्षा वाढविण्यात आली असून, धमकीच्या फोननंतर एअर मार्शल्सना तैनात करण्यात आले आहे. 

दरम्यान, दिल्ली विमानतळावर राष्ट्रीय सुरक्षा गटाची (एनएसजी) तुकडी तैनात करण्यात आली आहे. धमकीचा कॉल फसविण्यासाठी करण्यात आला होता किंवा काय याबाबत पोलिस या प्रकरणी तपास करीत आहेत.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 4, 2015 01:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close