आता बस्स, पाकला दुप्पट बळानं उत्तर द्या !

आता बस्स, पाकला दुप्पट बळानं उत्तर द्या !

  • Share this:

parikar02 जानेवारी : सीमारेषेवर पाकिस्तानकडून होणार्‍या वारंवार कुरापात्यामुळे भारताने आता कडक भूमिका घेतली आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन करत राहिला तर सडेतोड उत्तर देऊ, अशा शब्दात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर पाकला बजावलंय. तसंच पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार झाला, तर दुप्पट बळानं त्याचं उत्तर द्या, असे आदेशच आता केंद्र सरकारने लष्कराला दिले आहेत.

गुरुवारी 31 डिसेंबर रोजी पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा सीमारेषेवर गोळीबार केला होता. जम्मू क्षेत्रात सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांनी सीमा रेषेचं उल्लंघन करत गोळीबार केला. पाकिस्तानी बीएसएफच्या सीमा चौकीवर विनाकारण गोळीबार केला. त्याला बीएसएफच्या जवानांनी सडेतोड उत्तर दिले. बीएसएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारामुळे पाक सैनिकांनी शरणागती पत्कारली. एवढंच नाहीतर पाक सैनिकांनी पांढरे ध्वजच फडकावले. पाककडून झालेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला. तर बीएसएफ जवानांनी पाकिस्तानचे चार जवान टिपले गेले. मात्र, तरीही सीमेवर पाकिस्तानची आगळीक सुरूच आहे. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पाकिस्तानी सैनिकांनी आज 12 ठिकाणी गोळीबार केला. हिरानगर आणि सांबा सेक्टरमधल्या बीएसएफच्या 12 पोस्टवर हल्ला झाला आहे. त्यामुळे आता संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानाला चांगलेच धारेवर धरले यापुढे जर गोळीबार केला तर सडेतोड उत्तर देऊ असा इशाराच पर्रिकर यांनी दिला.

Follow @ibnlokmattv

First published: January 2, 2015, 11:20 PM IST

ताज्या बातम्या