तटरक्षक दलानं दहशतवादी हल्ला उधळला,पाकची बोट उद्‌ध्वस्त

तटरक्षक दलानं दहशतवादी हल्ला उधळला,पाकची बोट उद्‌ध्वस्त

  • Share this:

Pakistan Boat02 जानेवारी : मुंबईवर 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी दहशतवादी समुद्री मार्गाने आले होते तसाच पुन्हा एकदा प्रयत्न झाला पण तटरक्षक दलानं हा दहशतवादी हल्ला उधळून लावलाय. ही बोट जेव्हा अडवण्यात आली तेव्हा बोटेवरील असलेल्या चौघांनी स्फोट घडवला. या स्फोटात चौघे जागीच ठार झाले. 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली.

कराचीच्या केपी बंदरावरुन एक बोट गुजरातच्या दिशेनं रवाना झाली होती. तटरक्षक दलाला याची कुणकूण लागली तेव्हा ही बोट पोरबंदरजवळ पोहचली होती. तटरक्षक दलाने या बोटेला घेराव घातला आणि थांबण्याचे आदेश दिले. अनेकवेळा थांबण्याच्या सूचना करुनही बोट न थांबल्यामुळे तटरक्षक दलाचा संशय वाढला. पण बोट अडवल्यानंतर त्यावर असलेल्या चार लोकांनी बोटेत स्फोट घडवून आणला. हा स्फोट इतका भीषण होता की, यात चौघांचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांच्या मृतदेहाचे अवशेषही सापडू शकले नाही. त्यामुळे नेमकी ही बोट कोणत्या उद्देशाने भारताकडे येत होती याचा खुलासा होऊ शकला नाही. पण ज्या पद्धतीने बोटेवरील संशयास्पद हालचाली आणि स्फोटामुळे या बोटेवर दहशतवादी होते. आपण पकडले जाऊ नये म्हणून त्यांनी स्फोट घडवला असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Follow @ibnlokmattv

First published: January 2, 2015, 6:18 PM IST

ताज्या बातम्या