S M L

जशास तसे, भारतीय जवानांच्या गोळीबारात पाकचे 4 सैनिक ठार

Sachin Salve | Updated On: Dec 31, 2014 11:37 PM IST

pakistan violates ceasefire again-8388931 डिसेंबर : अवघं जग नव वर्षाच्या स्वागतासाठी दंग आहे पण पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा सीमारेषेवर 'राडा' करण्याचा प्रयत्न केला. पण बीएसएफच्या जवानांनी पाक सैनिकांचे 'नापाक' इरादे उधळून लावले. पाक सैनिकांनी गोळीबार केला त्याला बीएसएफच्या जवानांनी कडाडून प्रत्युत्तर दिलं त्यात पाकचे चार जवान मृत्यू पावले. या अगोदर पाककडून झालेल्या गोळीबारात भारतीय एक जवान शहीद झाला.

जम्मू क्षेत्रात सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांनी सीमा रेषेचं उल्लंघन करत गोळीबार केला. पाकिस्तानने नेहमी प्रमाणे प्रथम गोळीबार केला. सांबा सेक्टरमध्ये बीएसएफच्या सीमा चौकीवर पाक सैनिकांनी विनाकारण गोळीबार केला. त्याला बीएसएफच्या जवानांनी सडेतोड उत्तर दिले. बीएसएफच्या जवानांनी केलेल्या गोळीबारामुळे पाक सैनिकांनी शरणागती पत्कारली. एवढंच नाहीतर पाक सैनिकांनी पांढरे ध्वजच फडकावले. पाककडून झालेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला. त्यामुळे बीएसएफच्या जवानांनी एकच हल्लाबोल केला. विशेष म्हणजे, जम्मू-काश्मीरमध्ये अखनूर सेक्टरमध्ये पाककडून झालेल्या गोळीबारात भारतीय जवान जखमी झाल्याचं वृत्त होतं. त्यानंतर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकने जर गोळीबार केला तर जशाच तसे उत्तर द्या असे आदेशच दिले होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 31, 2014 11:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close