26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड लख्वीची नजरकैद रद्द

26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड लख्वीची नजरकैद रद्द

  • Share this:

omtnvIabggdid_small

29 डिसेंबर  :  मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीउर रहमान लख्वीचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला असून इस्लामाबाद हायकोर्टाने लख्वीच्या नजरकैदेचा निर्णय रद्द करून त्याच्या अटकेचे आदेश फेटाळले आहेत.

झकीउर रहमान लखवीला दोन आठवड्यांपूर्वी पाकिस्तानाल्या दहशतवादविरोधी कोर्टाने जामीन मंजूर केला होता. मात्र, लखवीला जामीन मंजूर झाल्यानंतर भारताने प्रचंड नाराजी व्यक्ती केली होती. त्यामुळे पाकिस्तान सरकारने लखवीला शांतता भंग केल्याच्या कायद्याखाली पुन्हा एकदा अटक करून तुरुंगात नजरकैदेत ठेवले होते. मात्र, इस्लामाबाद हायकोर्टाने आज (सोमवारी) पाकिस्तान सरकारचे आदेश फेटाळले.

दरम्यान, सोमवारी हायकोर्टाने लखवीला दिलासा देत त्याची नजरकैदेतून सुटका केली आहे. लख्वीच्या सुटकेविषयी भारताने पाकिस्तानकडे निषेध नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 29, 2014 02:04 PM IST

ताज्या बातम्या