जम्मूमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार

जम्मूमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार

  • Share this:

ceasefire

27 डिसेंबर  :जम्मूजवळ आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्यांवर आज (शनिवार) पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार करण्यात आला.

आरएस पुरा सेक्टरमधील अरनिया येथील आंतरराष्ट्रीय सीमेवरील बीएसएफच्या चौक्यांवर आज पहाटे 1च्या सुमारास पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. आधुनिक शस्त्रास्त्रांच्या साहाय्याने पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांना लक्ष्य केले. बीएसएफच्या जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. सुमारे तासभर गोळीबार सुरू होता.

या गोळीबारात एकही भारतीय जवान जखमी झालेला नाही. पाकिस्तानी सैन्याने याच आठवड्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौकीवर गोळीबार केला होता. 

Follow @ibnlokmattv

First published: December 27, 2014, 2:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading