पेशावर हल्ल्याचा कट रचणारा मुख्य सूत्रधार ठार

पेशावर हल्ल्याचा कट रचणारा मुख्य सूत्रधार ठार

  • Share this:

Pakistan-troops-in-Waziri-006

26 डिसेंबर : पाकिस्तानमधील पेशावर येथील सैन्याच्या शाळेवर दहशतवादी हल्ला घडवणार्‍या तालिबानी कमांडरला पाकिस्तानी सैन्याने ठार मारले आहे. सद्दाम असे या तालिबानी कमांडरचे नाव असून तो 'तेहरिक ए तालिबान' या दहशतवादी संघटनेचा सदस्य होता.

काही दिवसांपासूर्वी पेशावरमधील लष्करी शाळेवर तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये सुमारे 150 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने या हल्ल्याविरोधात पाकमध्ये संताप व्यक्त होता. पाकिस्तान सरकारनेही तालिबानी दहशतवाद्यांविरोधात कठोर पावले उचलण्याची घोषणा केली असून पाकिस्तानी सैन्याने तालिबानी दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेल्या भागांमध्ये कारवाईला सुरुवात केली आहे. गुरुवारी रात्री खैबरमधील जमरुदपूर भागात पाकिस्तानी सैन्य आणि तालिबानी दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये तालिबानी कमांडर सद्दामला कंठस्नान घालण्यात यश आल्याची माहिती स्थानिक अधिकार्‍यांनी दिली आहे. या चकमकीमध्ये काही दहशतवादी गंभीर जखमी झाले असून त्यांना सैन्याने ताब्यात घेतले आहे.

Follow @ibnlokmattv

First published: December 26, 2014, 9:22 PM IST

ताज्या बातम्या