राजस्थानमध्ये 26 जानेवारीला बाँबस्फोट घडवण्याची धमकी

राजस्थानमध्ये 26 जानेवारीला बाँबस्फोट घडवण्याची धमकी

  • Share this:

terror attack_india_alrt

26 डिसेंबर : 26 जानेवारीला राजस्थानमधील अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करु अशी धमकी देणारा मेल इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेनं पाठवला आहे. राजस्थानमधील 10 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांना अधिकृत मेलआयडीवर हा ई- मेल आल्यामुळं खळबळ उडाली आहे.

भारतात झालेल्या अनेक दहशवादी संघटनांमध्ये मुजाहिदीनचा हात असल्याने या ई-मेलचा गंभीरपणे माग घेण्यात येत आहे. राजस्थानमध्ये पोलीस व सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क झाले आहेत. त्याचं बरोबर नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही सरकारच्या वतीने करण्यात आले आहेत.

'आम्ही इंडियन मुजाहिदीनची माणसं आहोत. 26 जानेवारी रोजी आम्ही मोठा स्फोट घडवून आणणार आहोत. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. आमचं तुम्हाला खुल्ल आव्हान आहे. आम्हाला थांबू शकलात तर थांबवून दाखवा..!, असं त्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे.

राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद्र कटारिया यांच्यासह राजस्थानच्या 10 कॅबिनेटमंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांनाही हा धमकीचा ई- मेल मिळाला आहे. याप्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून मेल नेमका कुठून आला याचा शोध घेत आहेत. तसचं राज्यात दक्षतेचे आदेशही देण्यात आले आहेत, अशी माहिती गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Follow @ibnlokmattv

First published: December 26, 2014, 5:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading