...ही दोस्ती तुटायची नाय, माकडाने वाचवले माकडाचे प्राण !

...ही दोस्ती तुटायची नाय, माकडाने वाचवले माकडाचे प्राण !

  • Share this:

save_monkey34322 डिसेंबर : मैत्री..माणसांमधलं असलेलं एक सुंदर नातं...हे नातं प्राण्यांमध्येही असतं, याचा प्रत्यय कानपूरमध्ये नुकताच आला..एका माकडाला विजेचा धक्का लागला आणि तो बेशुद्ध पडला...दुसर्‍या एका माकडानं प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याला शुद्धीत आणलं.

झालं असं की, कानपूर रेल्वे स्टेशनवर एक माकड वीजेच्या तारेवर चालत होतं. त्याला शॉक लागला आणि ते बेशुद्ध पडलं. दुसर्‍या माकडानं 20 मिनिटं शर्थीचे प्रयत्न केले.

आपल्या बेशुद्ध मित्राला त्यानं चाटलं, चावलं, थोड्या थपडा मारल्या आणि शेवटी पाण्यात ढकललं..आणि बघतो तर काय! 20 मिनिटांनंतर ते माकड चक्क शुद्धीवर आलं. यू-ट्यूबवर असलेला हा व्हिडिओ सध्या खूप गाजतोय.

Follow @ibnlokmattv

First published: December 22, 2014, 4:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading