लख्वीला जामीन मिळणे धक्कादायक- नरेंद्र मोदी

लख्वीला जामीन मिळणे धक्कादायक- नरेंद्र मोदी

  • Share this:

PM_Modi_Lok_Sabha_speaking_650

19 डिसेंबर :  मुंबईतील 26/11च्या हल्ल्याचा मास्टर माइंड आणि लष्कर- ए- तय्यबाचा कमांडर झकिउर सहमान लख्वीला दहशतवादविरोधी न्यायालयाने जामीन मंजूर केल्याबद्दल शुक्रवारी लोकसभेमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी याचा निषेध केला. सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांना उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारने आपल्या भावना कडक शब्दांत पाकिस्तानपर्यंत पोहोचविल्या असल्याचे सांगितले.

पेशावरमधील शाळेत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप मुलांचा जीव गेल्यानंतर दुसर्‍याच दिवशी एका दहशतवाद्याला जामीन मिळाल्याची घटना धक्कादायक असल्याचेही मोदी यांनी सांगितले. तर पाकिस्तान सरकारच्या प्रत्येक कारवाईवर केंद्र सरकार लक्ष ठेवून असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले. पाकिस्तान सरकार सर्व दहशतवाद्यांकडे एकाच नजरेतून पाहात नसल्याचेही या घटनेतून स्पष्ट झाल्याचंही यावेळी त्या म्हणाल्या. पाकिस्तानी सरकारने दहशतवाद्यांविरोधात कडक पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी आपल्या भाषणावेळी केली.

Follow @ibnlokmattv

First published: December 19, 2014, 3:08 PM IST

ताज्या बातम्या