लोकसभेत गदारोळ करत भाजपचं वॉकआऊट

30 जुलैभारत-पाक संयुक्त निवेदनाच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी आज लोकसभेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांना खंबीर पाठिंबा दिला. त्यापूर्वीच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही पंतप्रधानांचं समर्थन केलं होतं. पण निवेदनाच्या मुद्द्यावर पक्षांतर्गत मतभेद मात्र कायमच आहेत. त्यामुळे भाजपला मात्र आयता मुद्दा मिळाला. लोकसभेत काँग्रेसच्या शक्तिप्रदर्शनामागे त्यांनी पंतप्रधान एकटे नसल्याचा स्पष्ट संदेश दिला. पाकिस्तानबाबतच्या भूमिकेवर सोनिया गांधीनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठिंबा दिला. त्यानंतर संसदेतही काँग्रेस पंतप्रधानांच्या पाठिशी राहिली. पाकिस्तानसोबतच्या चर्चेचं पंतप्रधानांनी बुधवारी जोरदार समर्थन केलं होतं. यासाठी पुढाकार घेणारे तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचंही मनमोहन सिंग यांनी तोंडभरून कौतुक केलं. आता सोनियांनी पंतप्रधानांना पाठिंबा दिला. त्यांनी म्हटलं की पाकिस्तानशी चर्चा पुन्हा सुरू करायला त्यांचा पाठिंबा आहे. पण पाकनं मुंबई हल्ल्यातल्या दोषींना शिक्षा देण्याबाबत गांभीर्य दाखवलं तरच ते शक्य होईल. सोनियांच्या भाषणात बलुचिस्तान आणि संयुक्त निवेदनाचा मुद्दा नव्हता.यावरून सरकार आणि काँग्रेस यांच्यात दुमत असल्याचं दिसतं. त्यामुळे विरोधकांना संधी मिळाली. या मुद्द्यावरून लोकसभेत गदारोळ झाला. आणि भाजपनं वॉकआऊट केलं. सरकारवर कुरघोडी करायला संयुक्त निवेदन नावाचा मुद्दा आता भाजपच्या हाती आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2009 01:11 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 30, 2009 01:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...