S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

'इस्रो'कडून 'जीएसएलव्ही मार्क-3'चे यशस्वी प्रक्षेपण

Samruddha Bhambure | Updated On: Dec 18, 2014 03:48 PM IST

'इस्रो'कडून 'जीएसएलव्ही मार्क-3'चे यशस्वी प्रक्षेपण

B5HIDxPCMAE-CHk

18 डिसेंबर : मंगळ भरारी घेतल्यानंतर अंतराळ मोहीमेमध्ये इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रातून 'जीएसएलव्ही मार्क 3' या प्रक्षेपक यानाचे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. मार्क-3 मुळे इस्त्रोला अंतराळात चार हजार टनाचे उपग्रह सोडणे शक्य झाले आहे. तसेच भारताच्या अंतराळात माणसाला पाठवण्याच्या महत्त्वाकांक्षेलाही बळं मिळालं आहे.

'इस्रो'च्या पीएसएलव्ही या उपग्रह प्रक्षेपणाला मागच्या दोन दशकांत मोठे यश मिळालं आहे. त्यानंतर 'इस्रो'ने आपलं पूर्ण लक्ष 'जीएसएलव्ही'या अत्याधुनिक उपग्रह प्रक्षेपकाच्या निर्मितीवर केंद्रीत केलं होतं. आजच्या या यशस्वी चाचणीमुळे अंतराळाच्या माणूस पाठवण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला बळं मिळणार आहे. हे इस्रोचे आतापर्यंतचे सर्वात मोठे लाँचींग व्हेइकल आहे. आतापर्यंतचे 'जीएसएलव्ही'चे वजन 400 टन असायचे. 2000 ते 2500 किलोग्रामचा पेलोड अंतराळात पाठवण्याची त्याची क्षमता होती. पण 'जीएसएलव्ही मार्क-3'मुळे भारत अवकाशामध्ये चार हजार टन वजनाच्या सॅटेलाईटचे प्रक्षेपण करण्यासाठी सज्ज असून अंतराळामध्ये मानव पाठवू शकेल.


Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2014 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close