इंधनाअभावी स्पाइसजेटची विमाने जमिनीवर

इंधनाअभावी स्पाइसजेटची विमाने जमिनीवर

  • Share this:

Spicejet-Baggage-Allowance

17 डिसेंबर :  तेल कंपन्यांनी क्रेडीटवर इंधन पुरविण्यास नकार दिल्याने स्पाईसजेट या कंपनीच्या एकही विमानाचे आज (बुधवार) उड्डाण होऊ शकले नाही.

आज कोणत्याही विमानाचे उड्डाण न झाल्याने स्पाइसजेट पुढील संकटात आणखी वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी स्पाइसजेटकडून आधीची थकबाकी रक्कम देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे स्पाइसजेटला इंधनाचा पुरवठा होऊ न शकला नाही. त्याअभावी आज एकही विमान उड्डाण घेऊ शकले नाही.

स्पाईटजेटला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण, तेल कंपन्यांनीच इंधन देण्यास नकार दिल्याने संकट वाढले आहे.

Follow @ibnlokmattv

First published: December 17, 2014, 10:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading