आता यू-ट्यूबवरचे व्हिडिओ पाहता येणार ऑफलाइन

आता यू-ट्यूबवरचे व्हिडिओ पाहता येणार ऑफलाइन

  • Share this:

YouTube-Offline-mode

12 डिसेंबर :   व्हिडिओ पाहण्यासाठी जगभरात सर्वांत जास्त वापरल्या जाणार्‍या यू-ट्यूबने गुरुवारी भारतात नव्या ऑफलाइन फिचरची घोषणा केली आहे. यामुळे अँड्रॉइड फोन वापरणारे नेटिझन्स आता यू-ट्यूबवरील व्हिडिओ डाउनलोड करून नंतर ऑफलाइन पाहू शकतील.

सध्या हे फिचर सर्व व्हिडिओसाठी उपलब्ध नसतील. व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी व्हिडिओ फ्रेमच्या खाली असलेल्या ऑफलाईन बटनवर फक्त टॅप करण्याची गरज आहे.

यूट्यूब ऑफलाइन फीचरवरून डाउनलोड करण्यात आलेला व्हिडिओ तासभर पाहण्यासाठी उपलब्ध राहील, असे सांगण्यात आले. कॉपीराइट असलेले व्हिडिओ मोफत डाउनलोड करण्याबाबतच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी ही तासांची मर्यादा घालण्यात आली आहे.

यू ट्युबच्या या फंड्यामुळे भारतीयांच्या यू ट्यूब व्हिजीटची संख्या वाढेल आणि व्हिडिओ पाहणं सोपं होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Follow @ibnlokmattv

First published: December 12, 2014, 12:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading