दिल्ली बलात्कार प्रकरण : उबेर कंपनीच्या टॅक्सीवर बंदी

  • Share this:

delhi_bertaxi08 डिसेंबर : टॅक्सीमध्ये एका तरुणीवर ड्रायव्हरनं केलेल्या बलात्कार प्रकरणानंतर दिल्लीतलं वातावरण तापलंय. दिल्ली सरकारने उबेर या कंपनीच्या सर्व टॅक्सी सेवांवर तपास पूर्ण होईपर्यंत बंदी घातली आहे. तसंच उबेरच्या काही कर्मचार्‍यांचीही पोलिसांनी चौकशी केली. बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला कोर्टात हजर करण्यात आलं.

शुक्रवारी रात्री दिल्लीत बलात्काराची घटना घडली होती. पण उबेर या कंपनीनं याचं खापर सरकारवरच फोडलंय. जागोजागी लक्ष ठेवणारी यंत्रणा नसल्याबद्दल सरकारला दोष दिलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ड्रायव्हर हा सराईत गुन्हेगार आहे. 2011 मध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती आणि सात महिने तिहार जेलमध्ये त्याने शिक्षा भोगली होती.

Follow @ibnlokmattv

First published: December 8, 2014, 4:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading