Elec-widget

एचआयव्हीबाधित मुलांवर गावक-यांचा अन्याय

एचआयव्हीबाधित मुलांवर गावक-यांचा अन्याय

10 जुलै एचआयव्हीची लागण झालेल्या दहा शाळकरी मुलांचा शिक्षणाचा हक्कच हिरावून घेण्याची घटना लातूरमध्ये घडली. ही एचआयव्हीग्रस्त मुलं शाळेत शिकणार असतील तर इतर मुलं शाळेत येणार नाहीत असा ठरावच हासेगावच्या ग्रामसभेनं केला आणि वादाला तोंड फुटलं. शुक्रवारी दिवसभर आयबीएन-लोकमतने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाला या प्रकरणाची दखल घेणं भाग पडलं. शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिलं आणि आता जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी तातडीनं हासेगावमधील विकासकामं थांबवण्याचे आदेश दिलेत. गावक-यांना धडा शिकवण्यासाठी अशी कारवाई केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतरही गावकरी सकारात्मक प्रतिसाद देत नसतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं आश्वासनही जिल्हाधिका-यांनी दिलंय.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 10, 2009 04:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...