4 डिसेंबर : अरबी समुद्रात बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हिरवा कंदील दिलाय. त्यामुळे आता हे स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झालाय.
भाजपची सत्ता आल्यानंतर शिवस्मारक उभारण्याची घोषणा भाजपनं केली होती. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वाची घोषणा केली.
मात्र अरबी समुद्रातलं शिवस्मारक याचा आराखडा आघाडी सरकारनं आखला होता. आता हाच आरखडा भाजप सरकार कायम ठेवणार का हे पाहावं लागेल.
(सविस्तर बातमी लवकरच)
Follow @ibnlokmattv |