मंत्र्यांना माफ करा, प्रकरण मिटवा -पंतप्रधान

मंत्र्यांना माफ करा, प्रकरण मिटवा -पंतप्रधान

  • Share this:

modi3452356204 डिसेंबर : राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वक्तव्यावरून संसदेत सुरू असलेला वाद असूनही संपत नाहीये. आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत निवेदन सादर करावं लागलं. निरंजन ज्योती यांनी माफी मागितली आहे. आता त्यांनी माफी मागितल्यावर प्रकरण संपवलं जावं अशी विनंती मोदी यांनी केली. तसंच या पुढे कुणी असं विधान करू नये अशी अपेक्षाही व्यक्त केली.

भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय अन्नप्रक्रिया राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी मुक्ताफळं उधळल्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झालीये. मुस्लीम आणि ख्रिश्चन ही रामाची मुलं आहेत, ज्यांना ही गोष्ट मान्य नाही ते भारतीय नाहीत असं वादग्रस्त वक्तव्यच साध्वी निरंजन ज्योती यांनी केलं होतं. एवढंच नाहीतर दिल्लीत एका झालेल्या रॅलीत साध्वी यांनी काँग्रेस विरोधात अपशब्द वापरले होते. साध्वी यांच्या विधानामुळे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी दोन्ही सभागृहात कडाडून विरोध केला. साध्वी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दोन्ही पक्षांनी केली. आपल्या विधानाबद्दल साध्वींनी दोन्ही सभागृहात माफी मागितली. पण विरोधकांनी माफीनामा काही स्विकारला नाही. तब्बल दोन दिवस विरोधकांनी साध्वींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेरीस आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धाव घ्यावी लागली. निरंजन ज्योती यांनी माफी मागितली आहे. आता त्यांनी माफी मागितल्यावर प्रकरण संपवलं जावं अशी विनंती मोदी यांनी केली. मात्र विरोधक यावर समाधानी झाले नाहीत. साध्वी निरंजन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केलीये.

Follow @ibnlokmattv

First published: December 4, 2014, 1:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading