Elec-widget

मुंबईत पावसाचा जोर : येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

4 जुलै मुंबईत पहिल्याच पावसात सगळीकडं पाणी साचलंय. शनिवारी दुपारपासून ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे दादरजवळील हिंदमाता परिसर, शिवडी, ऍन्टॉप हिल, अंधेरीत डी. एन. नगर, मरोळ, विलेपार्ले, चेंबूर या भागात संध्याकाळपासून पावसाचं पाणी साचायला सुरुवात झाली. मिठी नदीच्या परिसरातही झालेल्या जोरदार पावसामुळे नदीनं धोक्याची पातळी गाठली होती. पावसाचा जोर ओसरल्यानंतर नदीची पातळीही कमी झाल्याची माहिती महापालिकेनं दिली. मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पण पावसाचा जोर ओसरला आणि सायन भागात साचलेलं पाणी ओसरायला सुरुवात झाली. मात्र पश्चिम रेल्वे अर्ध्या तासाने, हार्बर रेल्वे 30 मिनिटांनी तर मध्य रेल्वेही 35 मिनीटे उशिराने धावत होती. मुंबईत पावसाचा वाढलेला जोर पाहता महानगरपालिकेनं अधिकार्‍यांना सतर्कतेचे आदेश दिलेत. मुंबईतील हेल्पलाईन्स बृहन्मुंबई महापालिका हेल्पलाईन नंबर 108 , 1916, 22694725, 22694727पोलीस नियंत्रण कक्ष हेल्पलाईन नंबर 100, 22620081, 22620081, 22625020अग्निशामक नियंत्रण कक्ष 101, 23085991, 23085992, 23085993रेल्वे पोलीस कंट्रोल रुम हेल्पलाईन नंबर 23759283, 23759201पश्चिम रेल्वे कंट्रोल रुम हेल्पलाईन नंबर 22017420

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2009 02:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...