'ख्रिश्चन-मुस्लीम ही रामाची मुलं; ज्यांना मान्य नाही, ते भारतीय नाहीत'

'ख्रिश्चन-मुस्लीम ही रामाची मुलं; ज्यांना मान्य नाही, ते भारतीय नाहीत'

  • Share this:

sadhavi02 डिसेंबर : मुस्लीम आणि ख्रिश्चन ही रामाची मुलं आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय अन्नप्रक्रिया राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर ज्यांना ही गोष्ट मान्य नाही ते भारतीय नाहीत, असं म्हणून त्यांनी या वादात आणखीनच भर घातलीय. मात्र काँग्रेसच्या विरोधानंतर साध्वी यांनी दोन्ही सभागृहात माफी मागितली.

भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय अन्नप्रक्रिया राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी मुक्ताफळं उधळल्यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झालीये. रामचं नाव घेणं हे समाजविरोधी आहे का ?, नरेंद्र मोदी यांनी जे काम केले आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक ठिकाणी भाजपचे सरकार येईल. देशाला ज्यांनी विकून खाले. देशोधडीला लावले त्यांचं सरकार येऊ देणार नाही. देशासोबत बेईमानी करणार्‍यांना आणखी काय म्हणायचं ?, ज्यांना जो अर्थ काढायचा तो काढावा असं विधान साध्वी यांनी केलं. तसंच दिल्लीत एका झालेल्या रॅलीत साध्वी यांनी काँग्रेस विरोधात अपशब्द वापरले होते. त्यातच मुस्लीम आणि ख्रिश्चन ही रामाची मुलं आहेत, ज्यांना मान्य नाही ते भारतीय नाही असं वादग्रस्त विधान करून साध्वी यांनीच वादात भर घातली. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसने साध्वी निरंजन ज्योती यांच्या विरोधात मोर्चाच उघडला.  साध्वी निरंजन ज्योतींच्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेसनं सस्पेन्शन नोटीस दिली. साध्वींनी लोकसभेत याबद्दल माफीही मागितली, पण विरोधक ही माफी स्वीकारायला तयार नाहीत. साध्वींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाई करावी, अशी विरोधकांनी मागणी केली आहे. दरम्यान, या वक्तव्यावरून संसदेत पुन्हा गदारोळ झाल्यानंतर निरंजन ज्योती यांनी दोन्ही सभागृहांमध्ये आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितलीय. पण विरोधक ही माफी स्वीकारायला तयार नाहीत.

Follow @ibnlokmattv

First published: December 2, 2014, 3:03 PM IST

ताज्या बातम्या