Elec-widget

इराकच्या युद्धकुंडातून जिवंत परतला पण 'त्या'ला पश्चात्तापही नाही !

इराकच्या युद्धकुंडातून जिवंत परतला पण 'त्या'ला पश्चात्तापही नाही !

  • Share this:

arif28 नोव्हेंबर : 'आम्ही जिहादसाठी निघालोय आणि आता जन्नतमध्ये भेट होईल' असं सांगून इराकच्या यादवीत सहभागी झालेला एक तरूण आरिफ माजिद भारतात परतलाय. त्याला राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयएच्या ताब्यात घेतलं आहे. पण आपण आयसीससारख्या दशहतवादी संघटनेत सहभागी झालो याचा त्याला जराही पश्चात्ताप नाहीये. सध्या त्याची चौकशी सुरू असून त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

इराकमध्ये ISIS  (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया) या दहशतवादी संघटनेमध्ये कल्याणमधील चार तरुण इराकमध्ये पोहचले होते. मात्र सात महिन्यांनंतर या चार तरुणांच्या डोक्यावरच भूत उतरलं. दोनच दिवसांपूर्वी या चारही तरुणांचा ठावठिकाणा लागला होता. चारही तरूण सुखरूप असून भारतात परतण्यासाठी इच्छुक आहे. या चौघांनी आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधला आणि भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या कुटुंबियांनी एनआयएशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. अखेरीस आज त्यापैकी आरिफ माजिद हा तरूण तुर्कीतून भारतात परतला. त्याच्या चौकशी सुरू आहे. पण एका बंदी घातलेल्या एका संघटनेचा सदस्य झाल्याने त्याला अटक होण्याची शक्यता आहे. आरिफ कट्टर विचारसरणीचा आहे. त्याला पश्चात्ताप झाला नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. इंटरनेटवरच्या जिहादी साहित्याने आरिफ प्रभावित झाला होता. इतर तिघांसोबत तो बगदादला गेला. तिथे 15 दिवस धार्मिक प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला युद्धभूमीवर पाठवण्यात आलं. तो गोळीबारात जखमी झाला आहे. तुर्कीतून परतलेल्या आरिफ फयाज माजिद याची एनआयए चौकशी करत असून त्यानं महत्वाची माहिती दिलीये असं सूत्रांनी सांगितलंय.

आरिफने आपल्या जबाबात काय माहिती दिली ?

- ISIS साठी युद्धात भाग घेतला, त्यात दोन गोळ्याही लागल्या

- जखमी झाल्यानंतर त्याला इंजिनियरिंग विभागात पाठवण्यात आलं

Loading...

- आरिफ हा सिव्हील इंजिनियर आहे

- ISIS च्या मुख्यालयाच्या इमारतीच्या कामात तो सहभागी होता.

- तो भारतातून केव्हा गेला हे मात्र त्यानं सांगितलं नाही. तसंच त्याला आणि त्यांच्या मित्रांना पैसा कुणी पुरवला याबाबतही तो चौकशीत उडवाउडवीची उत्तर देत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

- या युवकांना विदेशात पाठवण्यासाठी कुठलं मॉड्युल सक्रीय आहे याचा तपास करण्यावर NIA नं लक्ष केंद्रीत केलंय

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2014 10:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...