रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत ?

  • Share this:

Image img_230262_ravasahebdanve34_240x180.jpg26 नोव्हेंबर : भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. पण आता त्याअगोदर भाजप प्रदेशाध्यपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी या स्पर्धेत उडी घेतलीय.

प्रदेशाध्यक्षपद दिलं तर दानवे केंद्रातलं राज्यमंत्रिपद सोडणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रावसाहेब दानवेंनी पक्षाध्यक्ष अमित शहांकडे यासंदर्भात इच्छा व्यक्त केली असंही सूत्रांकडून सांगण्यात आलंय. दानवे सध्या केंद्रात ग्राहक संरक्षण राज्यमंत्री आहेत.

पण रावसाहेब दानवेंनी मात्र ही बाब नाकारली आहे. या संदर्भात मला पक्षनेतृत्वाने मला विचारलं नाही आणि ना मी तशी इच्छा व्यक्त केली. जिथे मी आहे तिथे आनंदी आहे पण पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारण्यास तयार आहे अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली.

Follow @ibnlokmattv

First published: November 26, 2014, 10:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading