काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून लोकसभेत गदारोळ

काळ्या पैशांच्या मुद्द्यावरून लोकसभेत गदारोळ

  • Share this:

parliament

25 नोव्हेंबर :  संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं आज (मंगळवारी) कामकाज सुरू होताच लोकसभेत परदेशातील काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ घातला. सरकारच्या भूमिकेचा विरोध करण्यासाठी तृणमूलचे खासदार सभागृहात छत्री घेऊनच आले होते. यावेळी काळा पैसा भारतात परत आणण्याबाबत सरकारने दिलेल्या आश्वासनावर संसदेत चर्चा करण्याची मागणी करत तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि जेडीयूच्या खासदारांनी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी निदर्शने केली.

त्याआधी तृणमूलच्या खासदारांनी सभागृहाबाहेरही काळ्या छत्र्या घेऊन आंदोलन केले. सरकारने काळा पैसा परत आणण्याबाबत संसदेत माहिती द्यावी, अशी मागणी तृणमूलच्या खासदारांकडून करण्यात आली. तसेच तृणमूलच्या खासदारांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची मागणी केली. दुसरीकडे इन्शुरन्समध्ये FDIला तृणमूलने विरोध केला आहे. या मुद्द्यावरून राज्यसभेतही गदारोळ झाला आहे. त्यामुळे इन्शुरन्स दुरुस्ती विधेकायवर अहवाल देण्यासाठीची डेडलाईन आता सरकारनं वाढवली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 25, 2014 02:13 PM IST

ताज्या बातम्या