नोकरदार, मध्यमवर्गीयांवर आणखी कर लादण्याच्या विरोधात - जेटली

नोकरदार, मध्यमवर्गीयांवर आणखी कर लादण्याच्या विरोधात - जेटली

  • Share this:

jaitley4_0_0_0_0_0

23 नोव्हेंबर : बदलती जीवनशैली, त्यानुसार लागणारा पैसा, वाढता प्रवासखर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, घेतलेल्या कर्जाचे हप्ते इत्यादी खर्चामुळे आधीच वाकलेल्या नोकरदार, मध्यमवर्गीयांवर आणखी करांचा बोजा लादण्याच्या आपण विरोधात असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.  कर चुकवेगिरी करणार्‍यांना कराच्या जाळ्यात आणण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

पीटीआय या वृत्तसंस्थेशी शनिवारी अरुण जेटलींनी संवाद साधून करविषयक भूमिका मांडली. जेटली म्हणाले, करदात्यांच्या खिशात जास्त पैसे जावेत असंच आपल्याला वाटतं आणि त्यावर आमचा जास्त भर आहे. त्यामुळे यामुळे करदात्यांची क्रयशक्ती वाढेल आणि अप्रत्यक्ष महसुलवसुली वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून अरूण जेटली या फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सध्या करमर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये इतकी आहे, ती वाढवून साडेतीन ते चार लाखांपर्यंत करणं शक्य आहे का याची चाचपणी सुरू असल्याचं जेटलींनी सांगितले.

Follow @ibnlokmattv

First published: November 23, 2014, 11:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading