सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी 'त्या' तिघांचा शोध सुरू

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 19, 2014 12:14 AM IST

sunanda pushkar drug overdose_0_0_018 नोव्हेंबर : काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. ज्या हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला त्या लीला हॉटेलमध्ये राहिलेल्या तीन लोकांचा दिल्ली पोलीस शोध घेत आहे.

सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या वेळी हे तीन जण लीलामध्ये होते. हे तीन जण परदेशी नागरिक होते, अशी माहिती पोलिसांना मिळालीय. त्यांच्याकडे खोटा पासपोर्टही होता, असंही सांगण्यात येतंय.

आयपीएलमधल्या आर्थिक वादाचा आणि सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का ? याची चाचपणी सुरू आहे. लवकरच दिल्ली पोलिसांची एक टीम दुबईला रवाना होणार आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2014 10:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...