मान्सून लांबणीवर : पाणी टंचाईचं संकट तर पेरण्या खोळंबल्या

23 जून राज्यातल्या काही भागात मान्सूनला सुरुवात झाली असली तरी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्यासाठी 2 ते 3 दिवस लागण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांनी आयबीएन-लोकमतशी बोलताना ही माहिती दिली आहे. ' अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मान्सून पुढे सरकला आहे. पण बंगालच्या उपसागरात जोपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत नाही तोपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता नाही, ' अशीही माहिती डॉ. खोले यांनी दिली आहे. देशात तसंच राज्यात गेल्यावर्षी कमी झालेला पाऊस आणि यंदा लांबणीवर पडलेला पावसाळा यामुळे सर्वत्र पाणी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. भूगर्भातली पाण्याची पातळीही खालावली आहे. येत्या दोन आठवड्यात पाऊस न आल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा मृग नक्षत्र उलटून गेल्यानंतरही पावसाचं आगमन लांबल्याने मराठवाड्यात पेरणीच झालेली नाही. औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यात पेरणीची टक्केवारी जेमतेम एक टक्का आहे. तर उर्वरीत मराठवाड्यात पाच टक्केही पेरणी झालेली नाही. कोरडवाहू शेतीसोबतच बागायतदार शेतकरीही अडचणीत आले आहेत. मोसंबी, द्राक्ष बागांनाही फटका बसला आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यावर्षी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस नाही. त्यामुळे पेरणी तर लांबलीच शिवाय विहिरींची पाणी पातळी खालावल्याने बागायती शेतकरीही अडचणीत सापडले आहेत. मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरीही यावेळी अडचणीत आहेत. जालना जिल्ह्यात अनेक मोसंबी बागायतदार बाग तोडून टाकत आहेत. पाऊस नसल्यामुळे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. नागपूरसह विदर्भातल्या शेतक-यांची चिंता अधिकच वाढली आहे. यंदा मान्सून मे च्या शेवटच्या आठवड्यात विदर्भात येईल, या अंदाजाप्रमाणे शेतक-यांनी पेरणीसाठी तयारी केली. त्यासाठी आवश्यक बियाणं, खतही खरेदी केलं होतं. पण आता पाऊस सध्या तरी येणार नाही असं दिसत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात 27 लाख हेक्टर शेतीपैकी केवळ एक ते दोन टक्यावर पेरण्या झाल्या आहेत. यापैकी काही ठिकाणी कापूस तसंच सोयाबीनची पेरणी शेतक-यांनी केली आहे.नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी खरिपासाठी जोरदार पावसाची अपेक्षा आहे. नाशिक जिल्ह्यात खरिपाचं लागवड क्षेत्र 6लाख 63हजार हेक्टर इतकं आहे. मशागतीची कामं पूर्ण करून आता शेतकरी जोरदार पावसाची वाट बघत आहेत. नेहेमीपेक्षा 3 आठवडे जास्त उलटून गेले तरी हवा तसा पाऊस न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मान्सूनचं आगमन नीट न झाल्यामुळे पंढरीच्या वारकर्‍यांना पाण्याची समस्या भेडसावत असल्याची कबुली वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी दिली आहे. पण वारकर्‍यांना सातारा आणि सोलापूरमध्ये पाण्याच्या अडचणी येणार नाहीत अशी व्यवस्थाही आम्ही केली आहे, असंही बबनराव पाचपुते म्हणाले आहेत.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2009 11:18 AM IST

ताज्या बातम्या