Elec-widget

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू रामपालच्या समर्थक आणि पोलिसांमध्ये चकमक

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू रामपालच्या समर्थक आणि पोलिसांमध्ये चकमक

  • Share this:

B2tVWfhCQAEfMx_

18 नोव्हेंबर :   हरियाणातील स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू बाबा रामपाल यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्यांच्या समर्थकांनी आज (मंगळवार) जोरदार गोळीबार आणि दगडफेक केली आहे. यावेळी पोलिस आणि समर्थकांमध्ये जोरदार चकमकही झाली. यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी आश्रमाबाहेर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्जही केला.

रामपाल या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू यांच हिसारमध्ये सतलोक आश्रम आहे. रामपालच्या समर्थकांनी 2006 मध्ये तिथल्या गावकर्‍यांवर गोळीबार केल्याप्रकरणी त्याच्यावर खटला सुरू आहे. पण वारंवार सूचना देऊनही 2010 पासून स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू रामपाल सलग 42 वेळा सुनावणीला गैरहजर राहिल्याने रामपाल यांच्या विरोधात पंजाब व हरियाणा हाकोर्टाने अटक वॉरंट काढले आहे. रामपाल यांना अटक करण्यासाठी 10 हजाराहून अधिक पोलिस त्यांच्या सतलोक आश्रमावर गेलेत. पण रामपाल यांच्या समर्थकांनी आश्रमाला वेढा घातला आहे. त्यामुळे पोलिसांना आश्रमात जाणासाठी भरपूर अडचणींचा सामना करावा लागत आहेत. या चकमकीत सुमारे 12 पोलीस जखमी झाले आहेत.

साध्या हिसार गावात रामपाल यांच्या समर्थकांमुळे तणावाचं वातावरण निर्माण झाला आहे. कोर्टात काल रामपाल उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानं राज्य सरकारला चपराक लगावली होती. हिसारमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 18, 2014 02:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...