90:10 कोट्याची पुढील सुनावणी 24 जूनला

90:10 कोट्याची पुढील सुनावणी 24 जूनला

22 जून, मुंबई अकरावी प्रवेशाच्या 90:10 टक्के फॉर्म्युलाविषयी मुंबई हायकोर्टाची पुढची सुनावणी 24 जुनला होणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी एसीसीच्या विद्यार्थ्यांना दिलेल्या 90 टक्के कोट्याविरोधातल्या कायदेशीर लढाईला सुरुवात झाली आहे. 90:10 टक्के कोटा निर्णय हा फक्त मुंबईपुरता नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी असल्याने राज्यभरातून केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी राज्यसरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरची सुनावणी सोमवारी होणार होती. राज्य सरकारच्या 90:10 टक्के कोटा फॉर्म्युलाची अधिकृत घोषणा शिक्षण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 18 जूनला केली होती. त्यावेळी 90:10 टक्के कोटाचा जीआर काढणार असल्याचंही शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. मात्र हा निर्णय आयसीएसई आणि सीबीएसई शाळेचे विद्यार्थी, पालक आणि मुख्याध्यापक यांना मान्य नव्हता. त्यामुळे ऍड. विराज मणियार, संजय गवाणकर आणि माहीमच्या बाँम्बे स्कॉटीश शाळेचा दहावीचा विद्यार्थी मिमॉय खेर या तिघांनी या याचिका दाखल केल्या. याचिकाकर्ते ऍड. विराज मणियार यांची मुलगी कांदिवलीच्या आयसीएसई बोर्डाच्या ठाकूर स्कूल या शाळेत शिकते. तर संजय गवाणकर आणि अन्य पाच सह याचिकाकर्त्यांची मुलं माहीमच्या बॉम्बे स्कॉटीश शाळेत शिकतात.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 22, 2009 12:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...