विमानप्रवास अवघ्या 699 रुपयांमध्ये!

विमानप्रवास अवघ्या 699 रुपयांमध्ये!

  • Share this:

Air-Asia_2

10  नोव्हेंबर : एअर एशिया ही कंपनीे सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. देशांतर्गत विमान प्रवास सर्वकरांसहित अवघ्या 699 रुपयांत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ही ऑफर आठवडाभरासाठी म्हणजेचं 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतचं सुरू असणार आहे.

बंगळुरू येथून चेन्नई, कोची, गोवा, जयपूर आणि चंदीगढ येथे जाणार्‍या तसेच या सर्व ठिकाणांहून बंगळुरू येथे येणार्‍या विमानाचा एका वेळचा प्रवास अवघ्या 699 रुपयांत उपलब्ध करून देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठीही ही ऑफर असून त्यासाठी त्यांना किमान 2599 रुपये मोजावे लागणार आहे. ही ऑफर फक्त बंगळुरूपासून देशाच्या मुख्य शहरांमध्ये जाण्यासाठी आहे, पण यामध्ये मुंबईचा समावेश नाही. या एक आठवड्याच्या काळात तुम्ही विमानाच्या तिकीटांचं रिझर्वेशनही करु शकता. त्यामुळे आता ज्यांना आपली विमानप्रवासाची हौस पूर्ण करून घ्यायची असेल तर त्यांनी आत्ताच तिकीट बूक करायला हरकत नाही.

  • 9 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ऑफर सुरु असणार
  • 10 जून 2015 ते 17 जानेवारी 2016 या कालावधीसाठी तिकीटे आरक्षित करता येणार
  • एकवेळच्या प्रवासाचे किमान तिकीट 699
  • देशांतर्गत प्रवासासाठी 699 आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी एका प्रवासाचे 2599 रुपये
  • बंगळुरु ते चेन्नई, कोची, गोवा, चंदीगढ, जयपूर, मात्र यात मुंबईचा समावेश नाही
  • मलेशियाच्या क्वालालंपूरला जाणार्‍या विमानांसाठी ऑफर
  • तब्बल 30 लाख आसनांसाठी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीची तिकिटे सवलतीच्या दरात उपलब्ध

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 10, 2014 02:44 PM IST

ताज्या बातम्या