S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

Samruddha Bhambure | Updated On: Nov 10, 2014 11:18 AM IST

केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर

PM_Modi_with_new_ministers_RB_650

10  नोव्हेंबर : केंद्रात सत्तास्थापनेच्या पाच महिन्यांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने काल (रविवारी) आपला पहिला मंत्रिमंडळ विस्तार केला. आणि रात्री 11 च्या सुमारास खातेवाटपही जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून सुरेश प्रभूंना कॅबिनेट, तर हंसराज अहिर यांना राज्यमंत्रिपद मिळालं आहे.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे अपेक्षेप्रमाणे संरक्षण मंत्रालय सोपवण्यात आलं आहे. हर्षवर्धन यांचेही आरोग्य खाते बदलले असून त्यांच्याकडे तंत्रविज्ञान मंत्रालय सोपवण्यात आला आहे. तर सुरेश प्रभूंकडे रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. याआधी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्याऐवजी त्यांच्याकडे आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार असेल. जे. पी. नड्डा यांना आरोग्यमंत्री करण्यात आलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ग्रामीण विकास मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. आता तो हरियानातील भाजप नेते बीरेंद्र सिंह यांना सोपवण्यात आलं आहे. सुरवातीला रेल्वेमंत्री असलेले डी. व्ही. सदानंदगौडा यांच्याकडे आता कायदा आणि न्याय खात्याची धुरा असणार आहे.राष्ट्रपती भवनात काल (रविवारी) दुपारी दीड वाजता झालेल्या शपथविधी समारंभात मनोहर पर्रिकर, सुरेश प्रभू, जे.पी. नड्डा आणि चौधरी बिरेंद्र सिंह यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. याशिवाय 3 स्वतंत्र प्रभार आणि 14 राज्यमंत्र्यांसह एकूण 21 नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. या विस्तारानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ सदस्यांची संख्या आता 66 वर पोहोचली आहे. यात पंतप्रधानांसह 27 कॅबिनेट, 13 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 26 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री

सुरेश प्रभू - रेल्वेमंत्री

जे. पी. नड्डा - आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं

चौधरी बिरेंद्र सिंह - ग्रामविकास खातं

राज्यमंत्री पदं

हंसराज अहिर- खते आणि रसायन राज्यमंत्री

मुख्तार अब्बास नक्वी - अल्पसंख्यांक विकास राज्यमंत्री आणि संसदीय कार्य राज्यमंत्री

बाबूल सुप्रियो- नगरविकास राज्यमंत्री

बंडारू दत्तात्रेय- कामगार आणि रोजगार

राजीव प्रताप रुडी- कौशल्यविकास, संसदीय कार्य राज्यमंत्री

राज्यवर्धन राठोड- माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री

फेरबदल

हर्षवर्धन : विज्ञान-तंत्रज्ञान (आधी आरोग्य)

सदानंद गौडा : कायदा व न्याय (आधी रेल्वे)

रवीशंकर प्रसाद : दूरसंचार व आयटी (कायदा मंत्रालय काढले)

अरुण जेटली : अर्थ, माहिती व प्रसारण (संरक्षण खाते काढले) 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 10, 2014 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close