S M L

पर्रिकर मुख्यमंत्रिपदातून मुक्त, पार्सेकर होणार मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Nov 8, 2014 01:15 PM IST

पर्रिकर मुख्यमंत्रिपदातून मुक्त, पार्सेकर होणार मुख्यमंत्री

08 नोव्हेंबर :अखेर आज मनोहर पर्रिकर गोव्याच्या भूमीला निरोप देणार आहे. पर्रिकर यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी होणार आहे. त्यासाठी पर्रिकरांनी मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाले आहे. त्यांच्या जागी गोव्याचे आरोग्य मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी जवळपास निश्चित झालंय. त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा आता बाकी आहे. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज दुपारी चार वाजता होणार आहे.

कोण आहेत लक्ष्मीकांत पार्सेकर

- विद्यमान आरोग्यमंत्री


- मांद्रे मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार

- हरमल पंचक्रोशी उच्च महाविद्यालयाचे प्राचार्य होते

- गोव्यात भाजप रोवण्यात महत्त्वाचा सहभाग

Loading...

- संघाचे स्वयंसेवक

- पर्रिकर सरकारमध्ये आरोग्य मंत्री म्हणून काम

- 2002 मध्ये गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष

मुख्यमंत्रिपदासाठी गटबाजीनाट्य

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदीनी त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी देण्याचं निश्चित केल्यामुळे पर्रिकराना गोवा सोडावा लागतोय. पण आता मुख्यमंत्रिपदावरून गोवा भाजपमध्ये गटबाजी आणि नाराजीनाट्य घडले. गोव्याचे उपमुख्यमंत्री फ्रांसीस डिसुझा यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केलाय. पण आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आङे. अखेर दुपारी 12 वाजता झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. विशेष म्हणजे, भाजपच्या संसदीय बोर्डाची नवी दिल्लीत बैठक झाली. गोव्याचे नवे मुख्यमंत्री कोण असतील, यावरही या बैठकीत चर्चा झाली. भाजप अध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, अरुण जेटली, जे.पी.नड्डा आणि राम लाल हे या बैठकीला हजर होते.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2014 12:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close