07 नोव्हेंबर : विशाखापट्टणम बंदराजवळ गुरुवारी रात्री नौदलाची युद्धनौका बुडालीये. ही नौका आपल्या रोजच्या कामावर जात असताना ही दुर्घटना घडली. यात एकाचा मृत्यू झालाय आणि अनेकजण बेपत्ता आहेत. आतापर्यंत 23 लोकांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलंय.
12 तासांपेक्षा जास्त अवधी उलटल्यानंतरही बेपत्ता लोकांचा शोध आणि इतर बचावकार्य अजूनही सुरू आहे. गुरुवारी रात्री युद्ध सराव पूर्ण करून टॉर्पेडो रिकव्हरी व्हेसल ही युद्धनौका बंदरावर परत येत असताना जलसमाधी मिळाली.
युद्धनौकेच्या लादी पत्र्याला तडा गेल्यामुळे ही दुर्घटना घडली. ही युद्धनौका 370 मीटर खोल पाण्याखाली गेली आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश नौदालाने दिले आहे.
Follow @ibnlokmattv |