डॉ. मनमोहनसिंग यांना जपानचा सर्वोच्च पुरस्कार

डॉ. मनमोहनसिंग यांना जपानचा सर्वोच्च पुरस्कार

  • Share this:

Manmohan singh

04 नोव्हेंबर :   माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची जपानच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. भारत आणि जपान यांच्यामधील संबंध दृढ होण्यासाठी मनमोहन सिंग यांनी दिलेल्या योगदानासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जपानचा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा हा पुरस्कार प्रप्त करणारे मनमोहन सिंग पहिले भारतीय ठरले आहे.

जपान आणि भारत यांच्यातील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आणि मैत्री दृढ करण्यासाठी गेली 35 वर्षे केलेल्या प्रयत्नांबद्दल डॉ. मनमोहनसिंग यांना 'द ग्रँड कॉरडॉन ऑफ द ऑर्डर ऑफ पाऊलोमनिआ फ्लॉवर' या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. मनमोहनसिंग यांनी आनंद व्यक्त करत 'दोन्ही देशांनी मैत्रीचे संबंध वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न केल्यास, हे संबंध नव्या उंचीवर पोचतील, असा विश्‍वास व्यक्त केला.

जपानचे सरकार आणि जपानी जनतेचे प्रेम आणि आपुलकीने आपण भारावून गेलो असल्याची प्रतिक्रिया मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली आहे. जपानबरोबर भारताची मैत्री वाढावी, हे माझे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. हे स्वप्न आता पूर्ण होताना मला दिसत असून, त्यामुळे मला आनंद होत असल्याची प्रतिक्रिया डॉ मनमोहन सिंग यांनी दिली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: November 4, 2014, 9:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading