विश्वासदर्शक ठरावाआधी सरकारमध्ये घ्या,सेनेची मागणी

विश्वासदर्शक ठरावाआधी सरकारमध्ये घ्या,सेनेची मागणी

  • Share this:

uddhav_meet_modi01 नोव्हेंबर : विश्वासदर्शक ठरावापूर्वी आपल्याला सरकारमध्ये घेण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. सेनेचे नेते अनिल देसाई यांची सध्या अर्थमंत्री आणि भाजपचे नेते अरुण जेटली यांच्याशी चर्चा सुरू आहे. देसाईंना सेनेकडून चर्चेसाठी सर्वाधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सत्तेत सहभागी झाल्यास सेनेला जी मंत्रिपदं दिली जातील त्यातली 8 नेत्यांची यादी आयबीएन लोकमतच्या हाती लागलीय. एकनाथ शिंदे, रवींद्र वायकर, विजय शिवतारे मंत्रिमंडळात येऊ शकतात. त्याशिवाय गुलाबराव पाटील, संजय राठोड, सुभाष देसाई, नीलम गोर्‍हेंचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवलीय. पण शिवसेना उपमुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहे. उमुख्यमंत्रिपदासाठी अनिल देसाईंचं नाव आघाडीवर आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2014 01:20 PM IST

ताज्या बातम्या