Elec-widget

पद्मसिंह पाटील यांना 14 जूनपर्यंत सीबीआय कोठडी

8 जून पद्मसिंह पाटील यांना केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) शनिवारी रात्री सुरू उशीरा अटक केली. या अटकेनंतर काल रविवारी दुपारी पद्मसिंह पाटील यांना पनवेल इथल्या न्यायालयात दाखलकरण्यात आलं. न्यायालयाने त्यांना 14 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.उस्मानाबादचे काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांचा खून 3 जून 2006 रोजी नवी मुंबईत कळंबोली इथे झाला होता. या प्रकरणातला आरोपी पारसमल जैन याच्या कबुलीजबाबानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला आणि अखेर पद्मसिंह पाटील यांची काल कुलाबा इथल्या तन्ना हाऊसमध्ये चौकशी झाली. त्यानंतर लगेचच त्यांना अटक झाल्याचं सीबीआयने जाहीर केलं. पण मध्यरात्री पद्मसिंह पाटील यांना अचानक हाय ब्लड प्रेशरचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना जे.जे. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमाराला सीबीआयचं पथक पद्मसिंहांना घेऊन पनवेल कोर्टाच्या दिशेने रवाना झालं. ही बातमी कळल्यावर कोर्टासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. आमदार जितेंद्र आव्हाड यात आघाडीवर होते.काल पनवेल इथल्या न्यायालयात अर्ध्या तासाच्या सुनावणीनंतर पद्मसिंह पाटील यांच्यावर आयपीसी कलम 302 अंतर्गत खुनाचा आणि 120 बी खुनाचा कट रचल्याचा गुन्हा ठेवण्यात आला आहे. सीबीआयने यावेळी पवनराजे यांच्या हत्येची सुपारी घेणार्‍या पारसमल जैन यांचा कबुलीजबाब कोर्टापुढे सादर केला. पद्मसिंह पाटील यांचे वकील सुभाष झा यांनी ' पारसमल जैन यांनी कबुली दिली नसून दुस-या आरोपीने कबुली दिली असल्याचं सांगितलं.एखाद्या साध्या आरोपीप्रमाणे पद्मसिंह पाटील यांना बेलापूरच्या सीबीआय ऑफिसमध्ये काल पनवेलच्या कोर्टातून नेण्यात आलं. पद्मसिंह पाटील यांची अटक हा राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री जयंत पाटील दिली. ' पवनराजे यांच्या हत्येची सीबीआय चौकशी आणि तपास चालू आहे. त्यामुळे आतापर्यंततरी कोणता निष्कर्ष काढू नये. सीबीआयचा अंतिम निकाल येईपर्यंत तरी याच्यावर भाष्य करणं योग्य नाही, असंही गृहमंत्री जयंत पाटील म्हणाले. तर या प्रकरणाचा पक्षाशी संबंध नाही, असं शरद पवारांचं म्हणणं आहे. पण या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका माजी गृहमंत्र्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्या कारकीर्दीचे काही टप्पे- यंदा नव्यानेच खासदार बनलेले पद्मसिंह पाटील हे एमबीबीएस डॉक्टर आहेत. काही दिवस प्रॅक्टीस केल्यावर डॉ. पद्मसिंह राजकीय आखाड्यात उतरले. शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून ते जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रीय झाले. नंतर शरद पवारांशी त्यांची मैत्री झाली. त्यामुळेच त्यांना तब्बल 25 वर्षं मंंत्रिपदाचा लाभ मिळाला. पण त्यांची ही मंत्रिपदाची कारकीर्द गाजली वेगवेगळ्या घोटाळ्यांनी.पद्मसिंहांच्या तेरणा सहकारी साखर कारखान्यात 2001 मध्ये तब्बल 5 कोटींचा घोटाळा झाला . 'तेरणा'ची साखर विदेशात निर्यात केल्याचं भासवून कोलकात्यात विकण्यात आली. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने तेरणा कारखान्याला 35 कोटींचं बेकायदेशीर कर्ज देऊन घोटाळ्याला हातभार लावला. यानंतर तेरणा ट्रस्टचा घोटाळा प्रसिद्ध पावला झाला. या ट्रस्टने चक्क कारगील आणि मुख्यमंत्री निधीत भ्रष्टाचार केला. या घोटाळ्यात पद्मसिंहांना उस्मानाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष पवनराजे निंबाळकर यांनी साथ दिली. पण या घोटाळ्यांच्याच निमित्ताने पद्मसिंह आणि पवनराजे यांच्यात बिनसलं. परिणामी 2004 च्या विधानसभा निवडणुकीत पवनराजेंनी पद्मसिंह यांना थेट आव्हान दिलं. आणि पद्मसिंह अवघ्या पावणे पाचशे मतांनी विजयी झाले. पवनराजेंची ही लोकप्रियताच दोघांमधल्या दुश्मनीचं कारण बनली. दरम्यान बेकायदा कर्जवाटप प्रकरणी पवनराजेंनीही सहा महिने गजाआड काढले. पण गैरव्यवहार प्रकरणांचा निकाल लागण्यापूर्वीच त्यांची हत्या झाली. आणि या हत्याप्रकरणानेच पद्मसिंह पाटलांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभं केलं आहे.कसं घडलं पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरण ?पवनराजे निंबाळकर हे उस्मानाबाद जिल्ह्यातलं बडं प्रस्थ म्हणून ओळखले जायचे. 3 जून 2006 रोजी नवी मुंबईत कळंबोली इथे त्यांची हत्या झाली. पवनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे नातेवाईक. तर पद्मसिंह हे कृषीमंत्री शरद पवार यांचे कट्टर समर्थक होते. पवनराजे यांच्या हत्येत पद्मसिंहांचा हात असल्याची कुजबूज होती. पण आरोपी मिळत नव्हते. तीन वर्षानंतर खुनाला वाचा फुटली. 23 मे 2009 मध्ये दिनेश तिवारीला मुंबई क्राईम ब्रॅन्चने अटक केली. दिनेश तिवारीला पोलिसांनी बोलतं केलं आणि पवनराजेंच्या खुनाची हकीकत बाहेर आली. दिनेश तिवारीच्या कबुलीतून पारसमल जैनला अटक झाली. पारसमलमुळे सतीश मंदाडे पोलिसांच्या हाती लागला आणि त्यानंतर पोलिसांनी डोंबिवलीतले भाजपचे नगरसेवक मोहन शुक्ल याला पवनराजे हत्याकांडप्रकरणी अटक केली. या अटकेतून हत्येचा कट उघड झाला.सतीश मंदाडे आणि त्याच्या इतर सहकार्‍यांना अनेक प्रकरणात पवनराजे निंबाळकरांची अडचण होती. त्यांचा काटा काढण्यासाठी सतीश मंदाडे याने त्यांचा जुना मित्र निवृत्त एक्साईज इन्स्पेक्टर, आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील वॉर्ड नंबर 86 चे नगरसेवक मोहन शुक्ल याच्याशी संपर्क केला. मोहन शुक्ल यानं डोंबिवलीतच राहणारा त्याचा जुना मित्र पारसमल जैन, याची भेट सतीश मंदाडे याच्याशी घालून दिली. जैन व्यापारी आणि कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. सौदा ठरला 30 लाख रूपयांना. पारसमल जैननं त्याचा मित्र दिनेश तिवारीशी संपर्क केला. दिनेश हा उत्तर प्रदेशमधला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या खासदाराचा ड्रायव्हर आहे. जागेच्या व्यवहाराचा बहाणा करून या दोघांनी पवनराजे निंबाळकरांना कळंबोळीत बोलावलं. तिथे पवनराजे आणि त्यांचा ड्रायव्हर समद काझी या दोघांचा खून करून त्यांना मारण्यात आलं.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2009 05:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com