पद्मसिंह पाटील चौकशीसाठी सीबीआयच्या ताब्यात

6 जून पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणात उस्मानाबादचे खासदार पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. राष्ट्रवादी पक्षाचे खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे खून प्रकरणात संशयाचं बोट ठेवलं गेलं आहे. शुक्रवारी राष्ट्रवादीची चिंतन बैठक होती. बैठक संपल्यावर पद्मसिंह पवारांच्या सोबतच होते. पक्षानेही सीबीआय चौकशी होईपर्यंत पद्मसिंहांच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं होतं. पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी पद्मसिंह पाटील यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला गेला. या हत्याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या पारसमल जैनने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. पवनराजे निंबाळकर हे उस्मानाबाद जिल्ह्यातले बडं प्रस्थ म्हणून ओळखले जायचे. 3 जून 2006 रोजी नवी मुंबईत कळंबोली इथे त्यांची हत्या झाली. पवनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे नातेवाईक. तर पद्मसिंह हे कृषीमंत्री शरद पवार यांचे कट्टर समर्थक होते. पवनराजे यांच्या हत्येत पद्मसिंहांचा हात असल्याची कुजबूज होती. पण आरोपी मिळत नव्हते. तीन वर्षानंतर खुनाला वाचा फुटली. 23 मे 2009 मध्ये दिनेश तिवारीला मुंबई क्राईम ब्रॅन्चने अटक केली. दिनेश तिवारीला पोलिसांनी बोलतं केलं आणि पवनराजेंच्या खुनाची हकीकत बाहेर आली. दिनेश तिवारीच्या कबुलीतून पारसमल जैनला अटक झाली. पारसमलमुळे सतिश मंदाडे पोलिसांच्या हाती लागला आणि त्यानंतर पोलिसांनी डोंबिवलीतला भाजपचा नगरसेवक मोहन शुक्ल याला पवनराजे हत्याकांडप्रकरणी अटक केली. या अटकेतून हत्येचा कट उघड झाला. सतीश मंदाडे आणि त्याच्या इतर सहकार्‍यांना अनेक प्रकरणात पवनराजे निंबाळकरांची अडचण होती. त्यांचा काटा काढण्यासाठी सतीश मंदाडे याने त्यांचा जुना मित्र निवृत्त एक्साईज इन्स्पेक्टर, आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील वॉर्ड नंबर 86 चे नगरसेवक मोहन शुक्ल याच्याशी संपर्क केला. मोहन शुक्ल यानं डोंबिवलीतच राहणारा त्याचा जुना मित्र पारसमल जैन, याची भेट सतीश मंदाडे याच्याशी घालून दिली. जैन व्यापारी आणि कॉन्ट्रॅक्ट किलर आहे. सौदा ठरला 30 लाख रूपयांना. पारसमल जैननं त्याचा मित्र दिनेश तिवारीशी संपर्क केला. दिनेश हा उत्तर प्रदेशमधला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या खासदाराचा ड्रायव्हर आहे. जागेच्या व्यवहाराचा बहाणा करून या दोघांनी पवनराजे निंबाळकरांना कळंबोळीत बोलावलं. तिथे पवनराजे आणि त्यांचा ड्रायव्हर समद काझी हे दोघे मारले गेले.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 6, 2009 06:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...