सलमान खान 'स्वच्छ भारत' अभियानात सहभागी

सलमान खान 'स्वच्छ भारत' अभियानात सहभागी

  • Share this:

salmanoct22nare22 ऑक्टोबर :  महात्मा गांधी जयंतीदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'स्वच्छ भारत' अभियानात बॉलिवूड अभिनेता सलमान खान सहभागी झाला आहे. त्याने कर्जत येथे कचरा साफ करून, अभियानात सहभागी झाल्याचा फोटो त्यांने शेयर केला आहे.

सलमानला पंतप्रधानांनी या अभियानात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. तसेच पंतप्रधानांनी यावेळी आवाहन केले होते, की त्या व्यक्तीने आणखी नऊ व्यक्तींना अभियानात सहभागी होण्याचे निमंत्रण द्यावे. सलमानने ट्विटरवरून पंतप्रधानांचे अभिनंदन करत, या अभियानाला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सलमानसोबत निल नितीन मुकेशनेही या अभियानात सहभाग घेतला.

या अभियानात सलमानने आमिर खान, रजनीकांत, अजीम प्रेमजी, चंदा कोचर, उमर अब्दुल्ला, प्रदीप धूत, रजत शर्मा आणि विनित जैन यांनाही आवाहन दिलं आहे.

Follow @ibnlokmattv

First published: October 22, 2014, 1:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading