जयललितांची तुरुंगातून सुटका

जयललितांची तुरुंगातून सुटका

  • Share this:

India Corruption

17 ऑक्टोबर : बेहिशोबी मालत्तेप्रकरणी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची आज (शनिवारी) बंगळुरुमधल्या तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे. त्या 22 दिवसांनी तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. बंगळुरू जेलमधून त्यांनी थेट एअरपोर्टकडे प्रस्थान केलं असून काही वेळात त्या चेन्नई एअरपोर्टला पोहोचतील, जिथे त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

याप्रकरणी जयललिता यांना न्यायालयाने 4 वर्षांची कारावास आणि 100 कोटी रुपयांची शिक्षा सुनावली होती. जयललिता यांनी कर्नाटक हायकोर्टात याचिका दाखल केली होती, मात्र कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जयललितांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने जयललितांना दिलासा देत त्यांना जामीन मंजूर केला आहे.

चेन्नईत दिवाळी

चेन्नईत जयललितांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जयललिता यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आजच दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली आहे. जयललिता यांचे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त करत आहेत. जयललितांच्या स्वागतासाठी एअरपोर्टपासून ते अम्मांच्या पोज गार्डनच्या निवासस्थापर्यंत मानवी साखळी बनवण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: October 18, 2014, 4:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading