16 ऑक्टोबर : माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकर यांनी आज (गुरुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत सचिन एक गाव दत्तक घेणार आहे. असं गाव दत्तक घेऊन ते आदर्श बनावं अशी आपली इच्छा असल्याचं त्यांनी पंतप्रधानांकडे व्यक्त केली. तसंच शाळा आणि महाविद्यालयात खेळाचा विकास कसा करता येईल याबद्दलही सचिनने आपली इच्छा बोलून दाखवली. यावेळी सचिनची पत्नी अंजलीही उपस्थित होती.
मोदींनी ही सचिनच्या निर्णयाचं स्वागत केलंय. सचिन तेंडुलकर संसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत एक गाव दत्तक घेणार आहे अशी घोषणा मोदींनी टिवट्रवर केलीये. विशेष म्हणजे अलीकडे सचिनने मोदींच्या स्वच्छ भारत योजनेत सहभाग घेतला होता. सचिनने रस्त्यावर उतरून साफ सफाई केली होती. संसद आदर्श ग्राम योजनेनुसार संसद सदस्याला तीन गाव दत्तक घ्यायची असून त्यांचा विकास हा आदर्श गावच्या रुपात करायचाय. एका गावाचं विकास काम हे 2016 पर्यंत पूर्ण करायचंय आणि उर्वरीत दोन्ही गावांचा विकास 2019 पर्यंत पूर्ण करावा लागणार आहे.
Follow @ibnlokmattv |