S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

सावधान 'हुडहुड' येतोय !

Samruddha Bhambure | Updated On: Oct 10, 2014 04:59 PM IST

सावधान 'हुडहुड' येतोय !

 10 ऑक्टोबर :  हुडहुड हे चक्रीवादळ अंदमानपासून पुढे सरकले आहे आणि आता हे चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या उत्तर किनारपट्टीच्या दिशेने वेगाने पुढे येत आहे. यामुळे 160 प्रतिकिमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आंध्रच्या नऊ जिल्ह्यांमध्ये, तर ओडिशाच्या सोळा जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आली आहे. याआधी 12 ऑक्टोबर 2013 ला आलेल्या पाइलीन या वादळाने मोठे नुकसान केले होते, त्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. येत्या 24 तासांत हे वादळ अधिक आक्रमक होऊ शकतं असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. हे वादळ विशाखापट्टणमच्या किनारपट्टीवर रविवारी दुपारी धडकण्याची शक्यता आहे.

अंदमान, ओडिशा व आंध्र या तीन राज्यांवर याचा अधिक परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय. चक्रीवादळामुळे निर्माण होणार्‍या परिस्थितीला तोंड देण्यासाठी ओडिशा सरकारने पूर्ण तयारी केली आहे, असा दावा ओडिशा सरकारने केलाय. त्याचबरोबर बंगाल व बिहारचे एनडीआरएफ पथकही या वादळाचा सामना करण्यासाठी सज्ज झालं आहे. मात्र या वादळामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.


Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 10, 2014 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close