...अन्यथा मोठी किंमत मोजावी लागेल, अरूण जेटलींचा पाकिस्तानला इशारा

...अन्यथा मोठी किंमत मोजावी लागेल, अरूण जेटलींचा पाकिस्तानला इशारा

  • Share this:

arun jaithley

09 ऑक्टोबर :  पाकिस्तानने हल्ले थांबवावेत अन्यथा मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरूवारी) पाकिस्तानला दिला आहे.

पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यानंतर भारतानं अखेर पाकिस्तानला चोख उत्तर दिलंय. भारत- पाकिस्तान सीमेवरच्या 7 सेक्टर्समध्ये अजूनही गोळीबार सुरू आहे.

जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरच्या बीएसएफच्या चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तान सैन्याने काल (बुधवारी) रात्री बीएसएफच्या 60 चौक्या आणि सीमेवरील तब्बल 80 गावांतल्या घरांवर गोळीबार केला. यामध्ये गोळीबारात बीएसएफचे पाच जवान आणि 5 नागरिक जखमी झालेत.

पाकिस्तान सैन्याकडून गेल्या काही दिवसांत सतत गोळीबार करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत 7 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, 60 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानकडून वारंवार होणार्‍या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सीमेवरच्या गावकर्‍यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. सीमेवरील सुमारे 20 हजार नागरिकांनी गोळीबाराच्या भीतीने स्थलांतर केलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 9, 2014 01:46 PM IST

ताज्या बातम्या