पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरूच, गोळीबारात 2 ठार

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2014 12:45 PM IST

पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरूच, गोळीबारात 2 ठार

cease firing banner

08 ऑक्टोबर : भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरूच असून (आज) बुधवारी पहाटे पाकिस्तानच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात सांबा सेक्टरमध्ये 2 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच गेल्या काही दिवसात हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 7 वर पोचली आहे, तर सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानासह 6 जण जखमी झाले आहेत.

जम्मू काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेवर 40 भारतीय पोस्ट आणि 25 वस्त्यांवर पाकिस्ताननं मंगळवारी रात्री पुन्हा एकदा गोळीबार केला. बुधवारी सकाळ 9 वाजेपर्यंत हा गोळीबार सुरूच होता. भारतीय सैन्यानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. सीमा परिसरातल्या नागरिकांना घरांमध्येच राहण्याचे आदेश दिल्याचं बीएसएफच्या अधिकार्‍यांनी सांगितलं आहे.

पाकिस्तानने 1 ऑक्टोबरपासून सीमारेषेवर 17 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. या गोळीबारात आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे सीमा रेषेवरील गावांमध्ये राहणार्‍या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

दरम्यान, विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पाकिस्तानविरोधात नरेंद्र मोदींनी मौन सोडून कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2014 12:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...