जयललितांचा जेलमध्ये मुक्काम वाढला

जयललितांचा जेलमध्ये मुक्काम वाढला

  • Share this:

jayalalitha-asks-labour-unions07 ऑक्टोबर : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा जेलमधला मुक्काम वाढलाय. कर्नाटक हायकोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. जलललितांना जामीन देण्यासाठी कोणतंही पुरेसं कारण दिसत नसल्याचं कोर्टाने स्पष्ट केलं. सरकारी पक्षाने जयललितांना जामीन द्यायला आक्षेप नसल्याचं सांगितलं होतं. त्यापूर्वी जयललिता यांना कोर्टाने सशर्त जामीन दिल्याची बातमी आल्यानं त्यांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला होता. पण कोर्टाने जयललिता यांना दिलासा द्यायला नकार दिलाय. जयललिता गेल्या 27 सप्टेंबरपासून जेलमध्ये आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जयललितांना 4 वर्षांचा तुरुंगवास आणि 100 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय.

Follow @ibnlokmattv

First published: October 7, 2014, 5:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading