Elec-widget

पाटण्यात रावण दहनानंतर चेंगराचेंगरीत 32 जणांचा मृत्यू

पाटण्यात रावण दहनानंतर चेंगराचेंगरीत 32 जणांचा मृत्यू

  • Share this:

patna303 ऑक्टोबर : देशभरात विजयादशमी दसर्‍याचा सण उत्साहात साजरा झाला. पण या सणाला गालबोट लागलंय. पाटण्यातल्या गांधी मैदानावर रावणदहनाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली. त्यात जवळपास 32 जणांचा मृत्यू झालाय. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. 60 फूट उंचीच्या रावणाच्या पुतळ्याचं दहन झाल्यानंतर लोक परतत होते. त्यावेळी एकमेकांना ढकलून पुढे जाण्याच्या नादात चेंगराचेंगरी झाली. तर वीजेची तार पडल्याच्यी अफवा परसल्यामुळे चेंगरीचेंगरी झाल्याचं काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितलंय. या दुर्घटनेवेळी बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझीही त्याठिकाणी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांशी बातचीत करून घटनेचा आढावा घेतला. केंद्राने मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे.

धार्मिक ठिकाणी अशा घटना वारंवार घडतात. त्यावरच आहेत आयबीएन लोकमतचे सवाल

- धामिर्क ठिकाणी होणार्‍या अशा दुर्घटना टाळता येणार नाहीत का ?

- गर्दीचा अंदाज घेऊन नियोजन का केलं जात नाही ?

- अशा घटना वारंवार घडूनही योग्य ती सुरक्षा का पुरवली जात नाही ?

Loading...

- अफवा पसरू नयेत म्हणून खबरदारी का घेतली जात नाही ?

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2014 10:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...