जयललितांच्या जामीन अर्जावर सुनावणी लांबणीवर

जयललितांच्या जामीन अर्जावर सुनावणी लांबणीवर

  • Share this:

jayalalitha-asks-labour-unions30 सप्टेंबर : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी 6 ऑक्टोबर पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी बंगलूरूच्या विशेष कोर्टाने जयललितांना 4 वर्षाच्या तुरूंगवास आणि 100 कोटी रुपयांचा दंड भरण्याची शिक्षा सुनावला आहे. या निर्णयाविरूद्ध जयललितांनी कर्नाटक हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. दुसरीकडे त्यांची भेट घेण्यासाठी जेलबाहेर त्यांच्या समर्थकांनी रांगा लावल्या आहेत. तर तामिळनाडूत चित्रपट वितरक संघटनांनी जयललिता यांच्या अटकेचा निषेध व्यक्त केला आहे. त्यासाठी आज राज्यातली सर्व थिएटर्स बंद असणार आहेत.

Follow @ibnlokmattv

First published: September 30, 2014, 1:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading