जयललितांना 4 वर्षांचा तुरूंगवास, 100 कोटींचा दंड

जयललितांना 4 वर्षांचा तुरूंगवास, 100 कोटींचा दंड

  • Share this:

jayalalitha27 सप्टेंबर: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना 4 वर्षं तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी बंगळुरू विशेष कोर्टाने हा निर्णय दिलाय. यामुळे तामिळनाडूच्या मुख्यमंत्री गजाआड जाण्याची शक्यता निर्माण झालीये. त्यांना 100 कोटींचा दंडही ठोठावण्यात आलाय. 1991 ते 1996 या काळात मुख्यमंत्री असताना जयललितांनी साडे 66 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केली असा आरोप डीएमकेनं केला होता.त्यासंबंधी हा खटला आहे.

1991 ते 1996 या काळात मुख्यमंत्री असताना जयललितांनी साडे 66 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केली असा आरोप डीएमकेनं 1998 साली केला होता. जयललिता या दर महिन्याला एक रूपये वेतन घेत होत्या तर त्यांच्याकडे एवढी मालमत्ता कशी काय वाढली असा आरोप डीएमकेनं केलाय. 18 वर्षांपुर्वी जयललितांविरोधात खटला दाखल करण्यात आला होता तेव्हा त्या पहिल्यांदा मुख्यमंत्री बनल्या होत्या. याकाळात त्यांनी आपण 1 रुपये वेतन घेत असल्याचं जाहीर केलं होतं. परंतु त्यांच्याकडे 66 कोटींची मालमत्ता कुठून आली असा आरोप करण्यात आला. एवढंच नाहीतर देशभरात जयललिता यांच्या नावे हॉटेल असल्याचा दावाही करण्यात आलाय. विदेशातही त्यांच्या नावावर हॉटेल असल्याचा आरोप करण्यात आलाय. 2003 साली सुप्रीम कोर्टानी हा खटला तामिळनाडूच्या बाहेर हलवला. या निर्णयामुळे जयललितांच्या राजकीय कारकिर्दीवर दीर्घकालीन परिणाम होतील, असं बोललं जातंय. जयललितांच्या शिक्षेची बातमी पसरताच तामिऴनाडूच्या काही भागात याचे हिंसक पडसाद उमटले आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात जयललिता दोषी असल्याचा निर्णय बंगळुरूच्या विशेष कोर्टाने दिलाय. जयललिता यांची कोठडीत रवानगी करण्यात येणार आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यामुळे जयललितांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

Follow @ibnlokmattv

First published: September 27, 2014, 5:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading