राज बंद करा ही बकवास !

राज बंद करा ही बकवास !

22 मेला लोकसभा निवडणुकीनंतरची व्यूहरचना ठरवण्यासाठी मुंबईतल्या षणमुखानंद सभागृहात मनसेची नुकतीच सभा पार पडली. त्या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव यांचा चांगलाच समाचार घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून राज ठाकरेंना उद्धव ठाकरे यांनी चांगलंच फटकारलं आहे. दैनिक सामनाच्या कार्यालयातून मीडियाच्या कार्यालयामध्ये राजला प्रत्युत्तर देणारं पत्र पाठवण्यात आलं. त्या पत्राचा हा काही भाग -राज ठाकरे बंद करा बकवास. तुमच्या बेताल 'पकपकीमुळे' मराठी माणसांचा तमाशा होतोय. तमाशातील बारीप्रमाणे सवालजवाब करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. राज ठाकरे यांनी त्यांच्या पकपक भाषणात जे बकवास प्रश्न उपस्थित केलेत ते हास्यास्पद आहेत. उद्धव ठाकरे यांनी कोणाला मतदान केले? जेठमलानींनाच केले ना? असा त्यांचा सवाल आहे, होय मी मा.शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार महेश जेठमलानी यांनाच मतदान केले आहे. मी आणि माझ्याप्रमाणे असंख्य शिवसैनिक फक्त शिवसेनाप्रमुखांचे आदेश मानतात आणि जेठमलानी यांना मतदान केले त्याबाबत राज ठाकरे यांना संतापाचा झटका येण्याचे कारण काय? राज ठाकरे हे मराठमोळ्या रमेश किणीच्या खून प्रकरणात अडकले होते तेव्हा शिवसेनाप्रमुख स्वतः 'राज यातून कसा बाहेर पडेल हो...' यासाठी सतत जेठमलानींच्या संपर्कात होते. त्यामुळे युतीचे उमेदवार म्हणून किणी प्रकरणातील उपकारकर्ते म्हणून जेठमलानींना मतदान करणे हे कर्तव्यच ठरते, हे आता तरी राज ठाकरे यांना पटायला हरकत नाही. पण केलेल्या उपकाराची जाण ठेवून वागतील ते राज ठाकरे कसले...'मनसे'च्या दळभद्रीपणामुळे संजय निरुपम निवडून आले हे खरंच आहे. निरुपम आले व राम नाईक पडल्याचा जणू आनंदोत्सवच आता सुरू आहे. या निर्लज्जपणासही दाद द्यावीच लागेल. राज ठाकरे आता म्हणतात, निरुपमना शिवसेनेनेच मांडीवर घेतले होते ना? राजजी बरोबर आहे तुमचे, निरुपम बेईमान निघाले, खाल्ल्या मिठाला जागले नाहीत हे खरेच आहे. निरुपम मराठी माणसांच्या मुळावर येत आहे. हे ज्याक्षणी लक्षात आले, त्याक्षणी शिवसेनाप्रमुखांनी त्याच्या ढुंगणावर लाथ मारून हाकलून दिले. पण तुमचे काय? राज, आपण तर जन्मतःच माँसाहेबांच्या, बाळासाहेबांच्या मांडीवरच खेळलात. तुम्हाला काय कमी केले म्हणून बाळासाहेब व शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही गेलात?दोन मराठी माणसं भांडत आहेत व महाराष्ट्राचे दुश्मन टाळ्या वाजवत आहेत. हे चित्र मला नको आहे . तेच आज घडत आहे. राज ठाकरे ज्या पद्धतीची पकपक करत आहेत, बोलत आहेत त्यामुळे त्यांचंच पितळ उघडे पडत असून शिवसेनेच्या विचारांचे नाणे मात्र खणखणीत वाजत आहे. मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार मतांच्या फाटाफुटीमुळे पडले. त्यामुळे आता दिल्लीत मराठी माणसाची बाजू कोण मांडणार? ही आमची सल आजही कायम आहे. यावर राज ठाकरे विचारतात, 'मग शिवसेनेचे जे 11 खासदार निवडून आले ते नेपाळी आहेत काय?' ते नेपाळी नाहीत. मराठीच आहेत, पण मोहन रावले, सुरेश गंभीर, गजानन कीर्तिकरांसारखे उमेदवार मुंबईत पडले ते 'बांगलादेशी' होते असे राज ठाकरे यांना म्हणायचे आहे काय? गजानन कीर्तिकरांचा पराभव ज्या शालिनी ठाकरेंमुळे झाला त्या शालिनीताईंचे कूळ आणि मूळ काय? शालिनी ठाकरे मराठी आहेत की अमराठी असले फालतू प्रश्न विचारण्याच्या फंदात आम्ही पडलो नाही. दीपक सावंत यांना आम्ही पदवीधर मतदारसंघातून उभे केले होते, पण राज ठाकरे यांनी त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार अमरजितसिंह मनहास यांना पाठिंबा दिला होता. दीपक सावंत मराठीच होते ते काही नेपाळी नव्हते. काकांच्या पाठीत वार करून आपण निघून गेलात, शिवसेनाप्रमुखांची इमानेइतबारे सेवा करणारा थापा नेपाळीच आहे हे विसरू नका. राज ठाकरे आपण माँच्या मांडीवर वाढलात, बाळासाहेबांच्या मांडीवरही खेळलात व मोठे झालात. पण आपली वक्तव्ये पाहून वाटते की आपण आता खूप खूपच मोठे झाला आहात. आपले हात आभाळाला पोहोचलेत. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्रीही म्हणे आपणच ठरवणार आहात. जरूर ठरवा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हे आपल्यासाठी खूपच छोटे आहे. आपण आता इतके मोठे झाला आहात की महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदच काय, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व ब्रिटनचे राजपुत्र व राजकन्या कोण हेदेखील आपणच ठरवू शकता. आपल्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्याशिवाय मी दुसरे काय करू शकतो ?

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2009 06:35 PM IST

ताज्या बातम्या