उद्धव ठाकरे यांचं राज यांना जोरदार प्रत्युत्तर

23 मेराज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला वाद आता चांगलाच पेटला आहे. राज ठाकरे यांनी त्यांची बकवास बंद करावी, असा टोला उद्धव ठाकरे यांनी राजना त्यांच्या पत्रातून लगावला आहे. 'दैनिक सामना'तून मीडियाच्या कार्यालयत उद्धव ठाकरे यांनी राजना दिलेल्या उत्तराचं पत्र पाठवलं होतं. त्या पत्रातून उद्धव यांनी राज यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. लोकसभा निवडणुकीनंतरची व्यूहरचना ठरवण्यासाठी मुंबईतल्या षणमुखानंद सभागृहात मनसेची नुकतीच सभा पार पडली. त्या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव यांचा चांगलाच समाचार घेतला. राजने घेतलेल्या समाचाराला उद्धव ठाकरे यांनी पत्रातून उत्तर दिलं आहे. त्या पत्ररूपी उत्तरातून ' तमाशातल्या बारीप्रमाणे सवाल जवाब करण्याची माझी अजिबात इच्छा नसून बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे काम करणारा मी एक सच्चा शिवसैनिक आहे, असा वाक्‌बाण उद्धव यांनी राज यांच्यावर सोडला आहे. तसंच ' मनसेच्या दळभद्रीपणामुळेच संजय निरुपम निवडून आले, अशी टीकाही त्यांनी केली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानुसारच मी महेश जेठमलानी यांना मतदान केलं. त्यात राज यांना एवढा राग येण्याचं कारण काय असा सवालही त्यांनी केला आहे. काल राज यांनी त्यांच्या भाषणात 'उद्धव ठाकरेंनी मतदान कुणाला केलं ? जेम्स लेनचा खटला चालवणार्‍या जेठमलानींना?', अशीही विचारणा केली होती. त्याही प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पत्रातून चांगलंच उत्तर दिलं आहे. ते लिहितात - '' राज ठाकरे हे मराठमोळ्या रमेश किणीच्या खून प्रकरणात अडकले होते तेव्हा शिवसेनाप्रमुख स्वत: राजून यातून कसा बाहेर पडेल हो... यासाठी सतत राम जेठमलानी यांच्या संपर्कात होते. त्यामुळे युतीचे उमेदवार म्हणून किणी प्रकरणातील उपकारकर्ते म्हणून जेठमलानींना मतदान करणं हे कर्तव्यच ठरते हे आता तरी राज ठाकरे यांना पटायला हरकत नाही. पण केलेल्या उपकराची जाण ठेवून वागतील ते राज ठाकरे कुठले ?, असा प्रश्नही राज ठाकरे यांना केला आहे. कालच्या राज ठाकरे यांच्या बेताल वक्तव्यामुळे मराठी माणसाची मात्र फरपट होणार आहे. तसंच मनसे आणि सेनेच्या वादामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जोरदार फायदा होणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2009 06:35 PM IST

ताज्या बातम्या