वाढदिवशी नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2014 10:50 AM IST

वाढदिवशी नरेंद्र मोदींनी घेतले आईचे आशीर्वाद

Modi_Mother_1

17 सप्टेंबर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार) आपल्या 64व्या वाढदिवसानिमित्त गांधीनगरला जाऊन आई हिराबाई यांची भेट घेतली. यावेळी आईनेही त्यांना भरभरून आशीर्वाद दिले आहे. यावेळी मोदींच्या आईंनी जम्मू-काश्मीरमधल्या पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान मदत निधीत 5 हजार रुपयांची मदतही केली आहे.

पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर मोदींचा हा पहिलाच वाढदिवस आहे. मोदी काल (मंगळवार)पासून गुजरात दौर्‍यावर आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरातल्या समर्थकांनी त्यांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी केली आहे, पण स्वत: नरेंद्र मोदींनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून कार्यकर्त्यांनी तो साधेपणाने साजरा करावा असे आवाहन केले आहे. वाढदिवशीच्या कार्यक्रमांवर होणारा खर्च जम्मू-काश्मीरच्या पूरग्रस्तांना मदतनिधी म्हणून देण्याचे आवाहन मोदींनी देशवासीयांना केले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी देश-परदेशातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात येत आहेत. जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनीही मोदींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2014 08:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...